How to find your Own Skill आपले स्वतःचे कौशल्य शोधा

 नमस्ते महाराष्ट्र

                  मी संदीप काळे पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो आपल्याच Motivational_Marathi_Blog मध्ये.






              खूप सारे असे लोक आहेत त्यांना carrier करायचं आहे.मला ही वाटतं आणि त्या दिशेने मी पण प्रयत्न करतोय.पण आपण कित्येकांना पाहतो की ते बोलतात खूप छान आणि मग दुसऱ्या दिवशी विसरून येरे माझ्या मागल्या आणि रोजचा दिवस सारखाच याला काय अर्थ नाही.आणि बरका मी सांगायचंय विसरून गेलो मी काही motivational speaker वैगेरे नाही मी माझे experience आपल्या सोबत share करतोय. मला वाटतं की याचा उपयोग कोणाला तरी होईल.1% लोकांना जरी उपयोग झाला तरी आनंद आहे.

चला तर आपण सुरुवात करू.प्रथम आपण आपणास काही प्रश्न विचारू आणि त्यातूनच आपल्यातील सुप्त गुण जे आहेत.त्यांना ओळखून आपण Carrier निवडू किंवा तुम्हाला तुमचं carrier निवडण्यात थोडी मदत होईल.

 

Q.1- मला कोणते काम करायला आवडते ?

Ans- तुम्हाला जे काम करण्यात interest वाटतो ते तुम्ही बिनधास्त करा.भलेही त्यातून तुमचं आज काहीही उत्पन्न मिळत नाही.तुमच्या कामात ज्या काही खाचा खुणा आहेत त्यात तुम्ही  पारंगत व्हा.एक असा काम करा की आज जग तुम्हाला वेडे म्हणत असेल पण एक दिवस सारं जग तुम्हाला सलाम थोकेल.तुमचं इंटरेस्ट ज्यात आहे ते करा.

 

Q.2- मला माझा Interest कशात आहे हेच नाही माहिती ?

Ans - हे पहा जे काम तुम्ही मनापासून करत आहात आणि ज्या कामामध्ये तुम्हाला वेळेचं,खाण्यापिण्याचे भान राहत नाही. असा काम तुम्ही जे अगदी आनंदाने करता तेच.तोच interest तुम्ही जाणून घ्या.

 

Q.3- मला माझ्या कलेला मी वेळ देतो का आणि जर देत असलो तर किती ?

Ans - सर्व प्रथम आपण आपल्या कलेला वेळ दिला पाहिजे.आपल्या कलेचे आपण मास्टर झालो पाहिजे. तर आणि तरच आपण समोरच्याला हरवू शकतो.आपण आपल्या कलेला खूप सारा वेळ दिला पाहिजे जेणे करून ज्या पण कोणत्या खाचा खुणा असतील त्या समजतील.

 

Q.4 - आपल्याला ज्या गोष्टीमध्ये रस आहे त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे.ते मी करतो का ?

Ans - सुरुवाती सुरुवातीला आपण खूप उत्साही असतो त्या वेळी आपण खूप छान प्रकारे काम करो.पण जसा जसा वेळ जातो त्याच प्रमाणे आपलं सातत्य कमी कमी होत जातो.हे ना करता कायम आपण आपल्या कलेबद्दल positive energy create करत राहिला पाहिजे.

 

   वरील प्रश्न जो पर्यंत तुम्ही स्वतः ला विचारणार नाही तो पर्यंत तुमचं Confusion दूर होणार नाही.

 

     चला तर मग खूप points आहेत ते आपण पुढील ब्लॉग मध्ये नक्की पाहणार आहोत.

भेटू पुढील Blog मध्ये.तो पर्यंत रजा घेतो.

धन्यवाद.

 

STAY HEALTHY STAY POSITIVE STAY MOTIVATED

Comments

Popular posts from this blog

SWOT ANALYSIS IN MARATHI

How to earn Money Respect and Goodwill. Stay Positive Stay Motivated